पतपेढीची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तेचा लिलाव

राज्यातील डबघाईस गेलेल्या सहकारी पथसंस्थेच्या कोट्यवधींची कर्जवसुली करण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष बैठक घेतली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 21, 2016, 12:06 PM IST
पतपेढीची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तेचा लिलाव title=

जळगाव : राज्यातील डबघाईस गेलेल्या सहकारी पथसंस्थेच्या कोट्यवधींची कर्जवसुली करण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीला सहकार आयुक्त तसच ठेवीदार संघटनाही उपस्थित होत्या. 

मोठे कर्जदार मग ते कोणीही असो त्यांची नावं जाहीर करून त्यांची मालमत्ता लिलाव करुन कर्जवसुली करावी असं या बैठकीदरम्यान सांगण्यात आलं. राज्यातील सर्वाधिक घोटाळे जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेत उघड झाले होते. 

गुलाबराव पाटील सहकार मंत्री झाल्यानंतर अनेक ठेवीदारांनी पैसे कधी मिळणार असा तगादाच लावला होता. यामुळे सहकार राज्यमंत्र्यांनी राज्य सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याबरोबर पहिलीच बैठक जळगाव इथे घेतली. या बैठकीत ऍक्शन प्लान तयार केला गेला असून विशेष अधिका-यांची टीम करण्यात आलीय.