राज्यावर पुन्हा 'वीज'संकट! चंद्रपूर वीज केंद्रातील तीनच संच सुरू

राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचं संकट घोंगावतंय... चंद्रपूर वीज केंद्रातील केवळ तीनच संच सध्या सुरू आहेत. 

Updated: May 2, 2015, 05:44 PM IST
राज्यावर पुन्हा 'वीज'संकट! चंद्रपूर वीज केंद्रातील तीनच संच सुरू title=

चंद्रपूर: राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचं संकट घोंगावतंय... चंद्रपूर वीज केंद्रातील केवळ तीनच संच सध्या सुरू आहेत. 

उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी वाढली असतानाच २३४० मेगावॅट क्षमता असलेल्या चंद्रपूरची वीजनिर्मिती ७३४ मेगावॅटपर्यंत खाली आलीये. साधारणतः उन्हाळ्यात चंद्रपूरच्या केंद्रावरील संच पूर्ण क्षमतेनं चालवले जातात. 

मात्र यंदा संच क्रमांक  १ गेले प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी अभावी बंद आहे. संच क्रमांक २ देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलाय. एअर हिटिंगची समस्या उदभवल्यानं संच क्रमांक ५मध्ये बंद असून सहावा संचदेखील तांत्रिक कारणांनी बंद करण्यात आलाय. वीज केंद्राचे अधिकरी मात्र बिघाड त्वरेनं दरुस्त करून स्थिती पूर्ववत होईल, असं सांगत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.