नाशकात गतिमंद मुलीवर लष्करी अधिकाऱ्याकडून बलात्कार

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कर्नल विनोद सहानी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याला देवळाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

Updated: May 2, 2015, 05:13 PM IST
नाशकात गतिमंद मुलीवर लष्करी अधिकाऱ्याकडून बलात्कार title=

नाशिक: नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कर्नल विनोद सहानी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याला देवळाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

कर्नल विनोद सहानी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वैद्यकीय तपासणीसाठी आरोपी आणि मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. फूस लावून विनोद सहानी यांनी पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. 
 
यापूर्वीही गेल्या काही दिवसात लष्करातील जवान आणि स्थानिक लोकांशी अनेक प्रकारच्या वादाच्या घटना घडल्यात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.