ठाणे : देशात नोटबंदीनंतर आता ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचे साइड इफेक्ट म्हणजे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची भीती वर्तविली जात असतानाच सायबर गुन्हयांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भिवंडी शहरातील एका युवकाच्या अकाऊंड मधून तब्बल ५० हजार रुपयांची खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून विशेष म्हणजे हे ऑनलाईन व्यवहार भरता बाहेर परदेशात केल्याचे उघड होत आहे .
भिवंडी शहरातील भुसार मोहल्ला याठिकाणी राहणारा फरहान मद्दु हा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साखरझोपेत असताना ०८ . १५ वा च्या सुमारास मोबाईलवर एकापाठोपाठ आलेल्या सहा मेसेजने त्याची झोप चालवली. त्याने मोबाईल वरील मेसेज तपासले असता त्यावर ऑनलाईन खरेदी करून ४९३३२. ९३ रुपये त्याच्या आयडीबीआय बँक खात्यातून वजा केल्या बाबत लिहून आले. हे मेसेज बघून फरहानची झोप उडाली त्याने तात्काळ स्थानिक भोईवाडा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. परंतु त्यांनी या बाबत संबंधित बँकेत आणि सायबर गुन्हे शाखेत तकार करण्याचा सल्ला दिला .
फरहान मद्दु याने कल्याण नाका येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत जाऊन या बाबत तक्रार देत आपले मास्टर क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली आणि खात्यात झालेल्या व्यवहाराची प्रत घेऊन ठाणे येथील सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिली. विशेष म्हणजे फरहान कंदील मास्टर कार्ड हे तुटलेल्या अवस्थेत असून सायबर सेल मधील अधिक-यांनी दिलेल्या माहिती नुसार त्याच्या मास्टर कार्ड वर भारताबाहेर ऑनलाईन खरेदी झाल्याचे सांगितले असून , तक्रारी नंतर पंधरा दिवसांनी त्यांना आपल्या तक्रारीची माहिती घेण्या करिता बोलाविले आहे .
तर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केलाय ,आणि असे सायबर गुन्हे महिन्याला जवळपास ५० ते ६० दाखल होत आहे यामध्ये वाढ होत आहे ,तर अश्या गुन्ह्यात लोकांनी अलर्ट राहिले पाहिजे
- आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पिन कॉड नंबर किंवा चार डिजिट कार्ड ,किंवा otp नंबर लोकांनी कोणालाच देऊ नये.
कारण असे अनेक फोन नागरिकांना येतात की तुमचे कार्ड बंद करण्यात आले आहे ,तुम्हालाचा असेच काही नंबर आम्हाला सांगा असे बोलून नागरिक त्यांच्या बोलण्यात येतात आणि मग असे सायबर क्राईम घडतात ,तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नये कोणतीही बँक तुम्हचा कोणताही पासवर्ड नंबर मागत नाही ,असे आव्हान यावेळी पोलिसांनी केलेय .
अश्या प्रकारे अनेक सायबर क्राईम समाजात घडत आहेत ,यामध्ये तुम्हाला नोकरी मिळाली आहे त्यासाठी काही टर्म आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अमुक खात्यात अमुक एवढी रक्कम भरा ,तर तुम्हाला लॉटरी लागली आहे यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अमुक खात्यावर अमुक एवढी रक्कम भरावी लागेल ही प्रोसिजर फी आहे असे सांगितले जाते, तर काही बाहेर गावातील तरुण मुले काही मुलींशी मैत्री वाढवून तुला मी काही किमती वस्तू पाठवल्या आहेत परंतु तिची डयूट्यु भरायची आहे त्यामुळे तू अमुक अमुक खात्यात एवढी रक्कम भर असे सांगण्यात येतात ,तर काही वेळा मुली आपले खाजगी फोटो ही पाठवतात आणि त्यातून मग ब्लॅकमेलिंग सुरु होते आणि पैसे उकळले जातात असे अनेक सायबर गुन्हे सध्या घडत आहेत यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असे ही आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.