मध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'

आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.  काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

Updated: Jul 23, 2015, 12:59 PM IST
मध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा' title=

नाशिक: आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.  काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारांमध्ये कांद्याचे दर वाढायला सुरूवात झालीय. शेतकऱ्यांचं कांद्याचं पीक खराब झाल्यामुळं बाजारावर हा परिणाम होत असल्याचं सांगितलं जातंय. 

किरकोळ बाजारात ४० टक्क्यांनी कांद्याचे दर आधीच वाढले आहेत. मेट्रो शहरांमध्ये कांदा ३५ ते ४० रुपये किलोनं आता विकला जातोय. एकवर्षांपूर्वी २४ रुपये किलो कांद्याचे दर होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.