नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 06:52 PM IST
नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक title=

जळगाव : चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

चंद्रशेखर चौधरी याला  अटक करण्यात आली आहे. यात जळगाव जनता बँकेच्या सुनील जंगले या  कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. भादली येथील राजेश सराफ यांनी प्लॉट विक्रीतून ३० लाख मिळाले होते. 

जुन्या नोटा बदलून देण्यासाठी चंद्रशेखर चौधरी यांनी जळगाव जनता बँकेतील सुनील जंगले यांची भेट घालून ३० लाखाच्या बदल्यात चार लाखांचे कमिशन ही ठरलं. 

मात्र महिना उलटूनही नोटा बदलून मिळत नसल्याने सराफ यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.