लातूर : केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय.
काही दिवसांपूर्वीच उदगीर इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 19 लाखांच्या नोटा बदलीचे प्रकरणही पुढे आलं होतं. आता लातूर शहरातील आंध्र बँकेचा सहव्यवस्थापक आणि कॅशियरला अकरा लाखांच्या नोटा नवीन नोटा बदली करून देताना पोलिसांनी अटक केलीय.
बॅकेच्या कर्जदार असलेल्या मनोज घार या व्यक्तीकडून वीस टक्के कमिशनवर जुन्या ५०० आणि एक हजारच्या नोटा बदलून दोन हजार रूपयाच्या नवीन अकरा लाख रुपयांच्या या नोटा होत्या.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचून आंध्र बँकेचा सहव्यवस्थापक हेमांशू राजबहादूरसिंग, कॅशियर शिशुपाल राजपालसिंग या दोघांसहित लातूरमधील व्यापारी मनोज भानुदास घार याला अटक केलीय.