गुहागर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक कामबंद आंदोलन

जिल्ह्यातल्या गुहागर एसटी आगारातल्या कर्मचा-यांची आज अचानक कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

Updated: Jan 18, 2017, 12:42 PM IST
गुहागर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक कामबंद आंदोलन title=

रत्नागिरी : जिल्ह्यातल्या गुहागर एसटी आगारातल्या कर्मचा-यांची आज अचानक कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

वाहकावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा कर्माचाऱ्यांनी केला आहे. तसेच वाहकाला अटक केल्याप्रकरणी पोलिसांविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या एका मुलीने वाहकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वाहकाला अटक करण्यात आली.

आता हे आंदोलन जिल्हाभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद 

- वाहकावर चुकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा ठपका ठेवत काम बंद आंदोलन
- पोलिसांच्या विरोधात आंदोलन असल्याचं कर्मचाऱ्यांची माहिती
- बसमधून प्रवास करणाऱ्या मुलीने केली होती विनयभंगाची तक्रार.
- आंदोलन जिल्हाव्यापी होण्याची शक्यता.