धावती लोकल न पकडण्याचा सल्ला पडला महागात

धावती लोकल न पकडण्याचा सल्ला देणा-या तरुणालाच बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडलीय.

Updated: Mar 12, 2016, 08:44 AM IST
धावती लोकल न पकडण्याचा सल्ला पडला महागात title=

अंबरनाथ : धावती लोकल न पकडण्याचा सल्ला देणा-या तरुणालाच बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडलीय.

दीपक मलिक नावाचा तरुण अंबरनाथहून मुंबईकडे येणा-या लोकलमध्ये चढला. त्याचवेळी एक कुटुंब धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करु लागलं. ही लोकल पकडू नका असा सल्ला दीपकनं त्यांना दिला.

यावर संतापलेल्या कुटुंबातल्या काही लोकांनी दीपकला लोकलमधून खाली खेचलं आणि बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत अर्धनग्न करुन ही मारहाण करण्यात आली. यावेळी एकही रेल्वे पोलीस तिथं हजर नव्हता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात  अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय.