पुणे: कमी व्याजदरात कर्ज देण्याची कोणी ऑफर दिली तर या आमिषाला बळी पडू नका. दिल्लीत बसून पुण्यासह महाराष्ट्रातल्या ७५० नागरिकांना गंडा घालणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केली आहे.
बजाज अलाइंज आणि बजाज फाईनान्स मधून बोलत असल्याची बतावणी ही टोळी करत होती. ही टोळी कमी व्याजात कर्ज देतो अशी भुरळ पाडायचे. एकदा का समोरची व्यक्ती जाळ्यात आली की प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळले जायचे.
पैसे अकाऊंटमध्ये जमा झाले की ते त्या व्यक्तीशी संपर्क बंद करायचे. अशा पद्धतीने या टोळीने पुणे आणि महाराष्ट्रातील 750 नागरीकांना 4 कोटी 60 लाखाला या टोळीने गंडा घातलाय. अवनिशकुमार सिंग, मनिष गुप्ता आणि तरुण गुप्ता अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे ही उच्चशिक्षीत आहेत.
या आमिषाला बळी पडू नका