नाशिकमध्ये जोरदार पाऊस आणि कुंभनगरीत तिसरे शाहीस्नान

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर याठिकाणी तिसरे शाहीस्नानाला सुरुवात झाली असताना पावसाने जोरदार हजेरील लावली. गोदावरीतून दोन जण वाहून जाण्याची घटना घटत असताना जीवरक्षकांनी त्यांना वाचविले.

Updated: Sep 18, 2015, 01:11 PM IST
नाशिकमध्ये जोरदार पाऊस आणि कुंभनगरीत तिसरे शाहीस्नान title=

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर याठिकाणी तिसरे शाहीस्नानाला सुरुवात झाली असताना पावसाने जोरदार हजेरील लावली. गोदावरीतून दोन जण वाहून जाण्याची घटना घटत असताना जीवरक्षकांनी त्यांना वाचविले.

नाशिकमध्ये पावसात शाही मिरवणुकीला सुरुवात झाली असून, तिसऱ्या आणि अखेरच्या शाहीपर्वणीपूर्वीचं पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास शाही मिरवणूक उशिरा निघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर पावसामुऴे पंचवटी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय. पावसामुळे गोदापात्राची पाणी पातळी वाढली असून पात्रात कोणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.