मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... महत्त्वाचं म्हणजे गडकरी वाड्यावर जाऊन सरसंघचालकांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता विविध तर्कवितर्क लढवले जातायत.

Updated: Aug 3, 2015, 09:03 PM IST
मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... महत्त्वाचं म्हणजे गडकरी वाड्यावर जाऊन सरसंघचालकांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता विविध तर्कवितर्क लढवले जातायत.

भाजपचे पॉवरफुल नेते असोत, मंत्री असोत, अगदी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह असोत, सरसंघचालकांच्या भेटीसाठी सगळे नागपुरातल्या संघाच्या मुख्यालयात येतात... मात्र शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सरसंघचालक मोहन भागवतांनी सर्वांनाच धक्का दिला. नितीन गडकरींच्या भेटीसाठी ते चक्क गडकरी वाड्यावर पोहोचले. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

सदिच्छा भेट... की?

गडकरींना काही दिवसांपूर्वीच नात झालीय. त्यामुळे गडकरी कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी सरसंघचालक आल्याचं सांगण्यात येतंय... मात्र भागवत आणि गडकरी यांच्यात यावेळी बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय... या भेटीमागं दडलंय काय, असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय...

भाजप अंतर्गत धुसफूस?

केंद्रीय दळणवळण मंत्री असलेल्या गडकरींना सध्या दिल्लीत काहीसं साइडलाइन करण्यात आलंय. धोरणात्मक निर्णय घेणा-या पंतप्रधान मोदींच्या कोअर कमिटीमध्ये गडकरींचा समावेश नाहीय... गडकरींना सध्या काम करू दिलं जात नसल्याची भावना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्मयम स्वामी यांनीही अलिकडेच जाहीरपणे बोलून दाखवली होती.

भाजप अंतर्गत कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर भागवत-गडकरी भेट झाली का? बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमकं काय शिजलं? आणि सरसंघचालकांच्या आशीर्वादामुळं गडकरींचं भाजपमधलं स्थान आणखी बळकट होणार का? याकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.