झाकीर नाईकच्या मुंबईतील १० ठिकाणांवर छापे, गुन्हा दाखल

शनिवारी सकाळी झाकिर नाईकच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आलेत. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Updated: Nov 19, 2016, 10:59 AM IST
झाकीर नाईकच्या मुंबईतील १० ठिकाणांवर छापे, गुन्हा दाखल  title=

नवी दिल्ली : शनिवारी सकाळी झाकिर नाईकच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आलेत. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.

इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दोन दिवसांपूर्वी झाकिर नाईकच्या 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' या संस्थेवर सरकारनं पाच वर्षांची बंदी घातलीय. बेकायदेशीर कारवायांचा ठपका ठेवत ही बंदी घालण्यात आलीय.

आंतरराष्ट्रीय इस्लामिक वाहिनी 'पीस टीव्ही'शी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या लिंक्स आढळून आल्या आहेत. नाईकची भडकाऊ भाषणं दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देणारी असल्याचं तपासात आढळल्याचं गृहखात्याकडून सांगण्यात येतंय. तरूणांची माथी भडकवणं तसंच त्यांना दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त केल्याप्रकरणी नाईकविरोधात महाराष्ट्रातही गुन्हे नोंदवलेत. 

पीस टीव्हीवर दहशतवादाला उत्तेजन देणाऱ्या कार्यक्रमांना नाईकच्या एनजीओने फंडिंग केल्याचंही समोर आलंय.