पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर

 सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 10:28 PM IST
पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर title=

रत्नागिरी :  सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.

 सोबतीला आपल्या प्रियजनाला घेऊन सुरू होते ती कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर... धोपावे-दाभोळच्या खाडीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात न्यू इअर सेलिब्रेशनची बातच काही और...हाच आनंद साजरा करण्यासाठी कोकणच्या बॅकवॉटरचं दर्शन घडवणा-या क्रुज महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय... दाभोळ-धोपावेच्या खाडीत एक भव्य बोट पर्यटकांसाठी सज्ज झालीय. 

याठिकाणी केवळ कोकणच्या निसर्गाचंच दर्शन नाही तर बोटीवर पर्यटकांसाठी सांस्कृतिक मेजवानीही असते... लावणी आणि गोवन स्टाईलचं नृत्याचा अनुभव आणि धम्मालमस्तीसाठी पर्यटकांना गोव्याशिवाय पर्याय नव्हता...पण कोकणातच अशा फेस्टिव्हलचं आयोजन होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

अंधार पडू लागताच बोटीवरील रंगबेरंगी लाईट संथ पाण्यावर तरंगणा-या बोटीला एक वेगळीच झळाळी देतात...निसर्गाचा सहवास. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि खाद्यपदार्थांची चंगळ.

बोटीवरचा असा अनुभव घेता घेता बॅकवॉटरची सफर कधी संपते ते कळत देखील नाही. 

गेल्या काही वर्षात नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणारा पर्यटक कोकणाकडे वळू लागलाय. अशा क्रूज महोत्सावच्या निमित्तानं आजवर कधीही जगासमोर न आलेलं कोकणच्या बॅक वॉटरमधील सौदर्य जगासमोर येतंय. कोकणातल्या याच वैभवाचं दर्शन घडवणारी ही क्रुज पर्यटकांचं न्यू इअर सेलिब्रेशन संस्मरणीय करतेय.