ठाणे : कासारवडवली हत्याकांडात धक्कादायक खुलाशांची मालिका कायम आहे. हत्याकांड घडवून आणणारा क्रूरकर्मा हसनेन वरेकर हा आपल्या सगळ्याच बहिणींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करीत होता अशी धक्कादायक माहिती उघड झालीये.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हसनेनने आपल्या सगळ्याच बहिणींसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वयाचा विचार न करता तो त्यांच्या शरिराला नको तिथं स्पर्श करायचा. हे पाहून त्यांच्या आईनं हसनेनचं लग्न लावलं.
त्यानंतरही त्यानं मतिमंद बहिणीवर लैगिक अत्याचार सुरुच ठेवले होते. हल्लयातून वाचलेल्या सुबियानं पोलिसांना दिलेल्या जबाबात ही धक्कादायक माहिती उघड झालीये.