बदलापूर : बदलापूर पश्चिमेकडे भारनियमानसोबत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयत अनोखं आंदोलन केलं.
महावितरण कार्यालयात अभियंत्यांची आरती ओवाळून कार्यालयातील वीज पुरवठा तासाभरासाठी खंडीत केला.. वीज गेल्याने सामान्यांचे कसे हाल होतात याची प्रचिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करुन दिली.
बदलापूर पश्चिमेत भारनियमनासह वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडतात. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करुनही काहीच उपयोग होत नसल्यानं अकेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी असं हटके आंदोलन केलं.