मुंबई : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांमधलं अंतर अवघ्या काही मिनिटात कापता येणार आहे.
प्रवासाचा खर्चही अवघा अडीच हजार रुपये असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानं देशभरातून येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीत पोहचता येणार आहे.
हैदरबादमधली टर्बो मेघा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती शिर्डीचं विमानतळ बांधून पूर्ण होण्याची.