उल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय

नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated: Apr 23, 2015, 06:02 PM IST
उल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय title=

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र काही उमेद्वार असे आहेत कि त्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. निवडून आलेल्या उमेद्वारामध्ये चक्क सात दाम्पत्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयी पती-पत्नी उमेद्वारांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पाहा कोण आहेत ते विजयी पती-पत्नी उमेद्वार

-राष्ट्रवादीचे उमेदवार राधा कुलकर्णी आणि त्यांचे पती सुरेश कुलकर्णी विजयी
- शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील आणि त्यांचे पती शिवराम पाटील विजयी
- अपक्ष उमेदवार रंजना सोनावणे आणि त्यांचे सुधाकर सोनावणे विजयी
- शिवसेनेचे उमेदवार मनोहर मढवी आणि पत्नी विनया मढवी यांचा विजय  
- शिवसेनेच्या उमेदवार कोमल वास्कर आणि  सोमनाथ वास्कर हे नवरा बायको विजयी झालेत.
- राष्ट्रवादीचे उमेदवार नवीन गवते आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गवते
- शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी गवते आणि त्यांचे पती जगदीश गवते

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.