कभी खुशी, कभी गम - खैरेंचा मुलगा जिंकला, पुतण्या हरला!

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात कभी खुशी, कभी गम अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी झालाय. मात्र पुतण्या सचिन खैरेला पराभव स्वीकारावा लागलाय.

Updated: Apr 23, 2015, 06:02 PM IST
कभी खुशी, कभी गम - खैरेंचा मुलगा जिंकला, पुतण्या हरला! title=

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात कभी खुशी, कभी गम अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी झालाय. मात्र पुतण्या सचिन खैरेला पराभव स्वीकारावा लागलाय.

ऋषिकेश खैरे यांचा वॉर्ड क्रमांक 68 मधून 247 मतांनी विजय मिळवला. तर सचिन खैरे वॉर्ड क्रमांक 48 मधून पराभूत झाले. भाजपचे बंडखोर उमेदवार राजू तनवाणी यांच्याकडून सचिन खैरेंचा पराभव झाला. 

विजयानंतर 'हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है,' अशी प्रतिक्रिया ऋषिकेश खैरेंनी दिलीय. पराभवानंतर खैरे समर्थक आणि तनवाणी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं. सचिन खैरेंच्या पराभवामुळे व्यापारी प्रतिष्ठाननं उत्स्फूर्तपणे दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.