नाशिक: येवल्यात आज कृत्रिम पावसासाठी प्रयत्न सुरू होते. पण हे प्रयत्न, पहिला प्रयोग अयशस्वी झालाय. सोडण्यात आलेल्या आठ पैकी सात रॉकेट जमीनदोस्त झाली आहेत.
एका रॉकेटमुळं झालेल्या फवारणीमुळं खरंतरं तासाभरात पाऊस पडण्याची अपेक्षा होती पण तसं झालेलं नाही. त्यामुळं मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल प्रोफेशनल स्टडीज संस्थेनं हा प्रयोग स्वता:च्या खर्चानं राबविला. रॉकेटच्या सहाय्यानं ढगांमध्ये सिल्वर आयोडाईडचा उपयोग करून कृत्रिम पाऊस पडण्याची ही प्रक्रिया आहे, ज्या ठिकाणी प्रयोग केला जाईल. त्या ठिकाणाहून २० किलोमीटरच्या अंतरात पाऊस पडतो.
मराठवाडा आणि विदर्भात पावसानं ओढ दिलीय. त्यात धरण साठ्यानं तळ गाठल्यानं विभागात कृत्रिम पाऊस पडण्याचा विचार सरकार पातळीवर सुरु आहे. मात्र पाऊस पडेल की नाही त्याची खात्री नसल्यानं पहिला प्रयोग नाशिकमध्ये केला जातोय. जिल्हा प्रशासन, पर्यावरण खात्याचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानं सायगाव जवळ हा प्रयोग पार पडला आहे.
एअर ट्रफिक कंट्रोल,हवामान खातं यांसह विविध खात्यांची परवानगीने कमी खर्चातील हा प्रयोग यशस्वी झाला असता तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं असतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.