नाशिक निवडणुकीची रक्तरंजित सुरुवात, सेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

महापालिका रणधुमाळीची रक्तरंजित सुरुवात झालीय. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळचा खून करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Updated: Jan 21, 2017, 09:06 AM IST
नाशिक निवडणुकीची रक्तरंजित सुरुवात, सेनेच्या कार्यकर्त्याची हत्या title=

नाशिक : महापालिका रणधुमाळीची रक्तरंजित सुरुवात झालीय. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळचा खून करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शेजवळनं नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपच्या पवन पवारच्या वॉर्डातून शेजवळ इच्छुक उमेदवार होता. शुक्रवारी रात्री जेल रोड परिसरात त्रिवेणी पार्कजवळ शेजवळची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे सुरेंद्र शेजवळ यांच्या आईने या परिसरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये मनसेकडून गेल्या पोटनिवडणुकीत निवडणूक लढविली होती. 

जेलरोड त्रिवेणी पार्क येथे मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ याचा पूर्ववैमनस्यातून अज्ञात चार-पाच हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याच्या साहाय्याने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. सुरेंद्र शेजवळ याच्यावर नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात खून, मारामाऱ्या आदी गुन्हे दाखल आहेत.