डॉक्टर पत्नीकडून पतीची हत्या

सोमवारची सकाळीच नागपूरकरांना हादरवून सोडणारी बातमी समोर येतेय.  हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टर महिलेनं तिच्या पतीचा खून केल्याचं उघड झालं.  

Updated: Nov 30, 2015, 11:26 AM IST
डॉक्टर पत्नीकडून पतीची हत्या  title=

नागपूर :सोमरवारची सकाळीच नागपूरकरांना हादरवून सोडणारी बातमी समोर येतेय.  हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टर महिलेनं तिच्या पतीचा खून केल्याचं उघड झालं.  

रविकांत उके असं मृत व्यक्तीचं नाव आहे.  दरम्यान रविकांत यांची पत्नी ट्विंकल उके या पेशानं डेन्टिस्ट आहे. त्यांना पोलिसांनी अटक केलीय.  

घरगुती वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे.  पोलिस तपास सध्या सुरू आहे. गेल्याच आठवड्यात मुलाची सुपारी देऊन त्याला ठार मारल्याची घटना नागपुरात घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आल्यानं शहरात खळबळ उडलाी,य

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.