आता, महिलेच्या अपघातासाठी 'कोंबडी' जाणार तुरुंगात?

नागपुरात एक अजब गोष्ट घडलीय... इथे एका महिलेला अपघात झाला... या अपघातात या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. या अपघाताला कारणीभूत कोणी व्यक्ती नाही... तर एक कोंबडी या मृत्यूसाठी जबाबदार ठरतेय.

Updated: Aug 26, 2015, 11:53 AM IST
आता, महिलेच्या अपघातासाठी 'कोंबडी' जाणार तुरुंगात? title=
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : नागपुरात एक अजब गोष्ट घडलीय... इथे एका महिलेला अपघात झाला... या अपघातात या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. या अपघाताला कारणीभूत कोणी व्यक्ती नाही... तर एक कोंबडी या मृत्यूसाठी जबाबदार ठरतेय.

चंद्रपुरात शिव्या देण्याच्या आरोपावरुन पोपटरावांना झाली अटक... परभणीतल्या पाथरीत पोलिसांनी शेळीला जेलमध्ये डांबलं आणि आता कोंबडीही तुरुंगात जाणार असं दिसतंय. 

अधिक वाचा : आरोपी फरार झाले म्हणून शेळीला अटक

कारण या कोंबडीवर आरोप आहे तो एका महिलेच्या हत्येचा.. मात्र, कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यानं ही कोंबडी मोकाट फिरतेय. त्याचं झालं असं की नागपूरच्या अजनी भागात राहणारे योगीराज दहिवाल, पत्नी सुकेशनी आणि नऊ महिन्यांची मुलगी ज्योतिकासह दीक्षाभूमीला जात होते. त्यावेळी घरापासून २०० मीटर अंतरावर जातात तोच एका कोंबडीनं त्यांच्या चालत्या बाईकवर झडप टाकली. यांत सुकेशनी यांचा बाईकवरुन पडून जागीच मृत्यू झाला.

अधिक वाचा : शेळीची हत्या; कुत्रा वॉन्टेड!

अपघातात सुकेशनी बाईकवरून खाली कोसळल्या. मात्र, अशा परिस्थितीतही या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला म्हणजे ज्योतिकाला इजा होऊ दिली नाही. त्यांनी तिला कुशीत घट्ट पकडून ठेवलं होतं.

अधिक वाचा : शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार

पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी कोंबडी मालकावर काही कारवाई होऊ शकते का? याची चाचपणी केली जातेय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.  

VIDEO पाहा : गाय चालवते हातपंप, शेळी उघडते नळ!

रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरं, पक्षी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे.. त्यामुळं नऊ महिन्याच्या चिमुकलीच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.