हट्ट केला म्हणून आईनंच चिमुरडीचा दाबला गळा

रागाच्या भरात पोटच्या पोरीचा गळा घोटला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. मुस्कान सुभाष चौहान असं मृत्यूमुखी पडलेल्या या दुदैवी चिमुकलीचं नाव आहे... या हत्येप्रकरणी मुस्कानच्या आईला पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Apr 8, 2015, 01:58 PM IST
हट्ट केला म्हणून आईनंच चिमुरडीचा दाबला गळा title=
प्रातिनिधिक फोटो

पुणे : रागाच्या भरात पोटच्या पोरीचा गळा घोटला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. मुस्कान सुभाष चौहान असं मृत्यूमुखी पडलेल्या या दुदैवी चिमुकलीचं नाव आहे... या हत्येप्रकरणी मुस्कानच्या आईला पोलिसांनी अटक केलीय.
 
मुस्कानच्या मृत्यूचं कारण अतिशय धक्कादायक आहे... मुस्कानचे वडील बाहेर जायला निघाले होते. वडिलांबरोबर बाहेर जायचं, मुस्कान हट्ट करत होती... रडत होती... यामुळेच, चिडलेल्या आईनं - माधुरी चौहान हीनं मुस्कानच्या गळ्यातला दोरा ओढला.... याच दोऱ्यामुळे मुस्कानच्या गळा आवळला गेला... आणि मुस्कान बेशुध्द पडली... त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं.  

चौव्हान पती-पत्नीनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली... पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर घडलेला सगळा प्रकार चौहान यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर, मुस्कानच्या आईला वारजे पोलिसांनी अटक केलीय. त्यावरून पोलिसांनी माधुरी चौहान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.