जळगाव : जळगावमध्ये पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक संपला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय खून करून दरोडा टाकणे, घरफोडी, सोनसाखळी चोर, लुटमारी यांसाख्या घटना वाढल्या असताना पोलीस मात्र, तपास सुरु आहे एवढंच सांगून गुन्हेगारांचा माग काढण्यात अपयशी ठरताहेत.
चाळीसगावमध्ये राहुल देशमुख या युवकाची हत्या करून दरोडेखोरांनी घरातील लोखंडी तिजोरी फोडून केलेली साडेदहा लाखांची लुट, सराफ बाजारातील दागिना कॉर्नर दुकानातील दिवसाढवळ्या दागिन्यांची लूट, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंगाली सोने कारागिरांना एका खोलीत डांबून ठेवत ६ चोरट्यांनी केलेल्या ४८ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट, दिवसाआड होणाऱ्या घरफोड्या, वाळूमाफियांची दादागिरी या घटनांनी जळगाव हादरलंय.
या साऱ्या घटना जळगाव पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे अजून यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास जळगाव पोलिसांना करता आलेला नाही. त्यामुळे नागरीक भयभीत झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.