नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ८मधून बेपत्ता झालेल्या फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस या मुलीचा मृतदेह ठाण्यात घोडबंदर गायमुख इथं सापडलाय. दरम्यान, फ्रेंनशिला हिची मावशी आणि तिचा नवरा यांनी अपहरण केल्यानंतर ऐरोली येथे मुक्काम केला होता. मावशीने तीन दिवस तर तिच्या काकाने एक दिवस मुक्काम केल्याचे पुढे आलेय.
फ्रेंनशिला हिची हत्या काकानेच केल्याचा संशय आहे. पोलिसांनी तिच्या काकाला अटक केली आहे. घोडबंदर येथे फ्रेंनशिलाच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्यात. या अपहरण आणि हत्येबाबत पोलिसांनी तीन शक्यता व्यक्त केल्यात.
कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा एक अंदाज आहे. दुसरीकडे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, याचाही पोलीस तपास करतायत. तर मुलीवर शारीरिक अत्याचार झाले होते काय या दिशेनंही तपास सुरू आहे. काल रात्री फ्रेनशिलाच्या मावशीच्या नवऱ्यानं तिची हत्या करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घोडबंदरला जाऊन शोध घेतला. तेव्हा फ्रेनशिलाचा मृतदेह आढळला.
या हत्येमध्ये मावशीचा हात आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. ७ वर्षांची फ्रेंनशिला ऐरोलीच्या सेक्टर ८मधून २९ जूनला बेपत्ता झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.