मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचे संकट दूर

 मुंबईकरांसाठी पावसानं चांगली बातमी आणलीय. तुळशी आणि मोडकसागर तलावाच्या पाठोपाठ तानसा तलावही भरलाय. त्यामुळे मुंबईवचे पाणी संकट दूर झालेय. तर इतके दिवस पुणेकरांवर रुसलेला पाऊस अखेर पुणेकरांवर प्रसन्न झालाय. पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. 

Updated: Aug 5, 2014, 09:31 AM IST
मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचे संकट दूर title=

मुंबई/ पुणे : मुंबईकरांसाठी पावसानं चांगली बातमी आणलीय. तुळशी आणि मोडकसागर तलावाच्या पाठोपाठ तानसा तलावही भरलाय. त्यामुळे मुंबईवचे पाणी संकट दूर झालेय. तर इतके दिवस पुणेकरांवर रुसलेला पाऊस अखेर पुणेकरांवर प्रसन्न झालाय. पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. 

तानसा तलाव सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराला हा तलाव ओव्हरफ्लो झाला. मुंबई आणि परिसरात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे हे तीनही तलाव भरलेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालीय. त्यामुळे पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. सध्या दिवसातून एकदा पाणी पुरवठा सुरु होता. उद्यापासून पुणेकरांना दिवसातून २ वेळ पाणी मिळणार आहे. 

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं ७० टक्के भरलीयत. खडकवासला धरणातून पाणीही सोडण्यात येतंय. पण याच धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिह्यातली गावं आणि शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायचं असेल तर हा पाऊस असाच सुरु राहणं आवश्यक आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यामुळे उजनी धरणातली पाणीपातळी चिंताजनकरित्या खालावली होती. पण पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने उजनीला दिलासा दिलाय. उजनी धरणातला पाणीसाठा वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला दिलासा मिळालाय. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.