मुक्ता टिळक यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक येथेल एका कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. 

Updated: Apr 29, 2017, 08:38 PM IST
मुक्ता टिळक यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन title=

पुणे : नाशिक येथेल एका कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. 

देशात शिक्षणाच्या संधी बऱ्याच आहेत मात्र आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची वेळ येते. पुढे ते नोकरी व्यवसायासाठी तिथेच स्थायिक होतात. अशा तरुणांना पुन्हा मायदेशात बोलविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले होते. त्यानंतर या वादग्रस्त व्यक्तव्यावर टीका होऊ लागली आहे. 

मुक्ता टिळक यांचं वक्तव्य आरक्षण विरोधी आहे. मात्र त्यांना मिळालेलं महापौर हे पद देखील आरक्षणामुळेच मिळालेलं आहे. तेव्हा त्या हे पद सोडणार का? असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.