पंकजा मुंडे - सुधीर मुनगंटीवर यांच्यात एका कार्यक्रमात जुगलबंदी

अर्थमंत्रालयावरुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2017, 07:46 PM IST
पंकजा मुंडे - सुधीर मुनगंटीवर यांच्यात एका कार्यक्रमात जुगलबंदी title=

चंद्रपूर : अर्थमंत्रालयावरुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

निमित्त होतं चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ६०० शाळांना डिजिटल करण्यासाठी संगणक साहित्य वितरण कार्यक्रमाचे. समाजातील घटकांनी दिलेले कर्ज नेमकेपणाने परत करण्याच्या मुद्यावरुन ही जुगलबंदी सुरु झाली.

पंकजा मुंडेंनी महिला बचत गट आणि महिलांचे कौतुक करत महिलांना अधिक आर्थिक अधिकार देण्याची मागणी केली. 

त्यावेळी महिलांच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक असल्याचे सांगत अर्थखातं तुम्हाला देणार नाही, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आणि उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलली.