कोल्हापूर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं प्रकरण ताजं असतानाच असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातही घडलाय. कोल्हापुरातल्या ताराबाई पार्क इथल्या फॅब इंडिया शोरुममध्येच हा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
या शोरूममध्ये एक तरुणी खरेदी करण्यासाठी आली होती.. आवडीचे कपडे ट्रायल रूममध्ये पाहत असताना या शोरूमचा एक कर्मचारी तिचे मोबाईलवर शुटींग करत असल्याचं लक्षात आलं. याबाबतची तक्रार तिनं व्यवस्थापकाकडे केली. त्याचबरोबर शाहूपुरी पोलिसात याबाबत तक्रार केली.
यावरून पोलिसांनी प्रकाश आनंदराव इस्पुर्ले याला अटक
केलीय. त्याच्याकडून मोबाईल केलेले चित्रीकरण पोलिसांनी जप्त केले असून ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.