भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Updated: Apr 4, 2015, 08:00 PM IST
भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू title=

परभणी : भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

गंपू नारायन  राडकर या मांत्रिकानं महिलेला घरातून केसाला धरून बाहेर ओढलं. तिच्या शरीरावर इजा केल्या. तिच्या डोळ्यात लिंबू पिळलं. त्यामुळे जखमी झालेल्या सुमनबाईंना मुंबईला हलवण्यात आलं. मात्र दोन तारखेला जेजे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या बंडू धर्मे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक राडकरसह सुमनाबाईंचे मेहुणे श्रीराम धर्मे यांना अटक केली आहे. या दोघांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही  ग्रामीण भागात अंधश्रद्धेपोटी अंधश्रद्धेचे बळी जाणे सुरुच आहेत. लोणी बुद्रुक येथे एका मांत्रिकाने वृद्ध महिलेच्या अंगातले भूत काढण्याच्या कारणावरून आमावस्या दिवशी भर चौकामध्ये गोंधळ घालून  डोक्याचे केस ओढले. तसेच डोळ्यात लिंबू पिळून चाबकाचे जोरात फटके मारल्याने ही महिला गंभीर जखमी झाली.

हा प्रकार २० मार्च रोजी घडला असून  २४ तारखेला ही घटना उघडकीस आली होती. तर २ एप्रिल रोजी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये या वृद्धेचा तिच्या मेंदूवर सूज आल्याने उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पाथरी पोलिसांनी मयत महिलेच्या पुतण्याच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा आणि अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.