मनसे नगरसेवकानं सेना कार्यालय फोडलं!

अंबरनाथमध्ये ऐन दिवाळीत मनसेच्या माजी नगरसेवकाने एका शिवसैनिकाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

Updated: Nov 14, 2015, 07:19 PM IST
मनसे नगरसेवकानं सेना कार्यालय फोडलं! title=

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ऐन दिवाळीत मनसेच्या माजी नगरसेवकाने एका शिवसैनिकाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

तोडफोड करणारे कुणाल भोईर हे मनसेच्या विद्यमान नगरसेविका अपर्णा भोईर यांचे पती आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 

अधिक वाचा - पराभूत भाजप कार्यकर्त्यांचा सेना कार्यकर्त्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

शुक्रवारी १५ कार्यकर्त्यांसह  मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी मनोज शेलार यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करीत ही गुंडगिरी केली आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.