विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अचानक मराठीचा ताप आला...सकाळी सकाळी मनसेचे शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाईंच्या नेतृत्वात इंग्रजी पाट्यांना काळं फासंण्याचं आंदोलन सुरु झालं. बाजारपेठेतल्या रुपसंगम या जुन्या दुकानाच्या पाटीला काळं फासंल...
मनसेच्या कार्यकर्त्यांना हा असा अचानक मराठीचा राग का आळवासा वाटला..याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच स्वतःच्या मालकीच्या पण दुसऱ्याला चालवायला दिलेल्या हॉटेलची पाटीही इंग्रजीत असल्याचा साक्षात्कार कौस्तुभ देसाईंना झाला. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक उल्हास भोईर यांच्या हॉटेलची पाटी इंग्रजीत आहे...मग कौस्तुभ देसाईंना लाजे काजेस्तव आपल्याच हॉटेलच्या पाटीला काळं फासावं लागलं.
पण देसाईंनीच बांधलेल्या खड़कपाडा सर्कलवरील फ्लॉव्हर व्हॅली कॉम्प्लेक्सची पाटी, तिथल्या दुकानांच्या पाट्या याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं...दरम्यान या प्रकरणी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई सह 6 मनसे कार्यकर्त्यना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे..
काल डोंबिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या नगरसेवकाच्या वॉर्डात फेरीवालाविरोधात कायदा हातात घेतला...आता मनसेला आज काहीतरी करणं भागच होतं...मग सॉफ्ट टार्गेट म्हणून दुकानांच्या पाट्यांवर हा सगळा राग निघाला...पण मनसेच्या आंदोलनाचा मूळ उद्देशच स्टंटबाजी असल्यानं पितळ उघडं पडायचं ते पडलंच...