धुळे : मिस वर्ल्ड रॉलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल यांनी खानदेशचा भेट दिलीय, २०१४ ची मिसवर्ल्ड आणि मिस इंग्लंडने कोणताही गाजावाजा न करता, खान्देश आणि सातपुड्याची आदिवासी संस्कृती अभ्यास करण्यासाठी, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नला भेट दिली.
खान्देशात पोहोचली मिस वर्ल्ड आणि मिस इंग्लंड
या दोन्ही सौंदर्यवतींनी पोहचल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात.. या भेटीत सातपुड्यातील आदिवासी संस्कृतीचा रॉलीन आणि कॅरिनानं अभ्यास केला.
इतकंच नाहीतर जलसंधारणाच्या अनोख्या अशा शिरपूर पॅटर्नची त्यांनी पाहणी केली कुठलाही बडेजावपणा न आणता या दोघींनीही जलसंधारणाची कामं आणि भारतीय संस्कृती समजून घेतली या जलसंधारणाच्या कामामुळं स्थानिकांच्या जीवनात बदल झाल्याचं स्ट्रॉसनं म्हटलंय.
प्रेमाची भाषा हीच वैश्विक भाषा
जगात अनेक भाषा आणि संस्कृती आहेत. मात्र भारतात आल्यावर प्रेमाची भाषा हीच वैश्विक भाषा असल्याची अनुभूती झाली अशा शब्दांत भारतीय आदरातिथ्याचं तिनं कौतुक केलंय.
भारतीय साडी नेसण्याचा मोह
या सौंदर्यवतींना भारतीय साडी नेसण्याचा मोहसुद्धा आवरता आला नाही.. कॅरिनानं तर यानिमित्ताने पहिल्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
दुष्काळाच्या छायेतला महाराष्ट्र अशी नवी ओळख बनत असताना धुळे जिल्ह्यातल्या जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्ननं नवा आदर्श घालून दिला. या शिरपूर पॅटर्नचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना परदेशातल्या नागरिकांनाही त्याची भुरळ पडू लागल्याचं यानिमित्ताने दिसून आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.