नंदूरबार : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विजयकुमार गावित परिवाराला मोठा दिलासा मिळालाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
आत्तापर्यंत झालेली चौकशी ही समाधानकारक असून एफआयआर दाखल करण्याची गरज नाहीये, तसंच पुढील चौकशी करण्याचीही गरज नाही, असा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलाय.
राज्य सरकारने हा अहवाल मान्य केला आहे. याबाबतची पुढील सुनावणी १९ जूनला होणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीला चांगलंच खडसावलं होतं.
दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ता विष्णू मुसळे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.