मिरज अपघातात ६ ठार, ५ जखमी

मिरज-पंढरपूर रस्त्यावर रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2017, 04:33 PM IST
मिरज अपघातात ६ ठार, ५ जखमी  title=

सांगली : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवक काळाचा घाला पडला. मिरज-पंढरपूर रस्त्यावर रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. 

अगळगाव फाट्याजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जागीच ६ जण ठार झालेत.

टेम्पो ट्रॅव्हलरचा पार चक्का चूर झालाय. या अपघातात पाच जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान, एकाचा मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधले सर्व जण देवदर्शन करून परत येत होते