लातूर : लातूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करूनही एमआयएमला भोपळाही फोडता आलेला नाही. महापालिका निवडणुकांसाठी असदुद्दीन ओवेसी यांनी लातूरमध्ये दोन सभा घेतल्या होत्या. पण या दोन्ही सभांनंतरही एमआयएमला लातुरात प्रभाव पाडता आलेला नाही.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे. काँग्रेसचे दिव्ंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा गड शाबूत ठेवला होता. मात्र, त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी हा गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवला.
लातूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ३६ जागांवर भाजप, ३३ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा मिळाली आहे. या ठिकाणी शिवसेनेला खातेही उघडता आलं नाही. याआधी शिवसेनेला ६ जागा येथे मिळाल्या होत्या.