विरारमध्ये मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवले

विरारमध्ये एका मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी इतरांना मारहाण करत असून तिचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या कुटुबीयांनीच तिचे हात-पाय बांधून तिला घरात डांबून ठेवले आहे.  

Updated: May 26, 2015, 03:03 PM IST
विरारमध्ये मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवले title=

मुंबई : विरारमध्ये एका मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी इतरांना मारहाण करत असून तिचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या कुटुबीयांनीच तिचे हात-पाय बांधून तिला घरात डांबून ठेवले आहे.  

मोनिका या तरुणीवर गेल्या ९ वर्षांपासून मानसिक उपचार सुरु होते, पण गेल्या वर्षभरापासून तिचं मानसिक आरोग्य अधिकच ढासळलं होते, ती आजूबाजूच्या लोकांवर हल्ले करू लागली होती. अगदी तिच्या आईवरही तिने हल्ला करून तिला रक्तबंबाळ केलं होतं.

घराचीही तोडफोड केली होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला ठाण्याच्या प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले पण रुग्णालयाने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्या नातेवाइकानी नाइलाजने तिला बांधून घरात कोंडून ठेवले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.