मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक

लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2017, 08:46 AM IST
मराठवाडा, विदर्भात आज महापालिकेसाठी निवडणूक title=

मराठवाडा, विदर्भ : लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. 

एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलीय. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणारेय. उन्हाची काहिली पाहता मतदान वेळेत वाढ करण्यात आली आहे.

आता संध्याकाळी साडेसहापर्यंत मतदान होणारेय. तिन्हीही ठिकाणी दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलंय. 21 एप्रिलला तिन्ही महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे.