बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंगमधून बोपखेल गावकऱ्यांसाठीचा रस्ता अखेर खुला होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीच ही माहिती दिलीय.

Updated: May 28, 2015, 06:29 PM IST
बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर title=
फाईल फोटो

पुणे : पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंगमधून बोपखेल गावकऱ्यांसाठीचा रस्ता अखेर खुला होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीच ही माहिती दिलीय.

मात्र, पर्यायी रस्त्यासाठी सहकार्य केलं जाईल अशी भूमिका संरक्षण खात्यानं घेतली आहे. यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय न झाल्यास 8 जूनला संरक्षणमंत्र्यांसोबत पुण्यातल्या खासदारांची बैठक होणार आहे. 

कायम स्वरुपी रस्ता होईपर्यंत संरक्षण विभागातर्फे तात्पुरता पूल तयार करून दिला जाणार असल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलंय. गेल्या आठवड्यात बोपखेलवासियांनी या रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने हा प्रश्न चिघळला होता मात्र आता यावर संरक्षणमंत्र्यांनीच निर्णय दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.