व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश पारदर्शक होतील : तावडे

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण विविध महाविद्यालयांतील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यात येईल, तसेच प्रवेशप्रक्रिया गुणवत्तेवर आधारित करण्यात विचार असल्याचं, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Updated: Dec 12, 2014, 11:59 AM IST
व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश पारदर्शक होतील : तावडे title=

नागपूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण विविध महाविद्यालयांतील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यात येईल, तसेच प्रवेशप्रक्रिया गुणवत्तेवर आधारित करण्यात विचार असल्याचं, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशांमध्ये असलेल्या अनियमिततेबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने आता प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

व्यवस्थापनकोट्यातील पन्नास टक्के जागा या गुणवत्ताधारकांनाच असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अल्पसंख्यांक संस्था असल्याच्या नावाखाली काही महाविद्यालये विविध निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

अल्पसंख्यांक कोट्यातील जागा भरल्या नाहीत तर संबंधित मंत्रालयांकडून इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी घ्यायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले. नवी मुंबईमधील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबत सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांविषयी तावडे सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.