नागपूर : प्रेयसीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये. मोहिबे रसूल अन्सारी असे या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
मोहिबे याने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेमिकेला एका तरुणासोबत त्याच्या बाईकवर बसलेले पाहिले. त्यामुळे त्याचा जळफळाट झाला आणि संशय बळावला. यानंतर त्याने तिला २६ जानेवारीला भेटायच्या उद्देशाने बोलावले. त्यानंतर तिला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर मोहिबेने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात त्याने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले आणि हत्या केलीय. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.