एव्हेरस्टवर फडकवला महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा

औरंगाबाद पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा शेख रफीक आज औरंगाबाद मध्ये पोहोचलाय. भले भले ज्या शिखराला पाहून गारद होतात त्या एव्हेरस्टवर रफिकनं 20 मे रोजी महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावला आहे. 

Updated: Jun 8, 2016, 06:10 PM IST
एव्हेरस्टवर फडकवला महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा  title=

औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा शेख रफीक आज औरंगाबाद मध्ये पोहोचलाय. भले भले ज्या शिखराला पाहून गारद होतात त्या एव्हेरस्टवर रफिकनं 20 मे रोजी महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावला आहे. 

रफ़ीक औरंगाबाद ग्रामीण पोलीसमध्ये काँस्टेबल आहे. एव्हरेस्ट सर करण्याचा त्याचं स्वप्न होतं. याआधी 2 वेळा अयशस्वी ठरलेला रफीक तिसऱ्या प्रयत्नात मात्र यशस्वी झाले. ही मोहीम सर करण्यात अनेकांनी त्यांना मदत केली. मोठ्या प्रमाणात आर्थिक गरजाही त्यांना पूर्ण कराव्या लागल्या. पण मिळालेल्या यशमुळे जुन्या अडचणी विसरल्याचं रफीक यांनी यावेळी म्हटलं आहे. आज औरंगाबाद एअरपोर्टवर रफीकचे स्वागत करण्यासाठी अनेक औरंगाबादकर आणि पोलीस उपस्थित होते.