www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रिदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलानं आता टेक्ऩोसॅव्ही होण्याचं ठरवलंय. याचा डायरेक्ट फायदा नागरिकांनाच होणार आहे. कारण, लवकरच ‘एफआयआर’ नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
देशातलं सर्वात मोठं दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलानं एक पाऊल पुढे टाकलंय. नागरिकांचा आणि पोलिसांचाही वेळ वाचण्यासाठी, राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी पोलीस दलानं ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय. साहजिकच यापुढे ‘पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही किंवा गुन्हा दाखल करताना त्याची तीव्रता कमी केली’ अशा तक्रारींना आळा बसणार आहे.
१५ ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक जिल्ह्यात ऑनलाईन एफआयआर पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रे सार्वजनिक होणार असल्यानं तपासात पारदर्शकताही येईल. सध्या पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवायचा असेल तर किमान तीन तास लागतात. पण नव्या प्रणालीमुळे काही मिनिटातच हे काम होणार आहे. पोलिसांनाही तपास करताना काय तपास केला, कोणाचे जबाब घेतले याची माहिती ऑनलाईन नोंदवावी लागणार आहे.
ऑनलाईन पद्धतीसाठी सध्या पोलीस दलात प्रशिक्षण सुरु आहे. तपासावर नियंत्रण ठेवणं वरिष्ठांनाही त्यामुळे सोपं जाणार आहे. देशातून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना रोखणंही त्यामुळे शक्य होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.