दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Updated: Jun 20, 2016, 06:43 PM IST
दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु title=

मुंबई : दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. तसंच 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलंही दहीहंडी  उत्सवात सहभाग घेऊ शकतील अशीही भूमिका सरकार कोर्टात मांडणार आहे. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. यासंदर्भात सरकार लवकरच उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे.