सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. 

Updated: Jun 20, 2016, 03:45 PM IST
सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या title=

कोल्हापूर : सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. 

कोल्हापुरामधल्या बोंद्रेनगर भागातल्या धनगरवाड्यात, पल्लवी बोडेकर आणि तिची धाकटी बहिण निकिता अशा दोघीच राहायच्या. पल्लवीच्या घराशेजारी राहणारे संशयित आरोपी देवाप्पा बोडके, चंदू बोडके, राजू शेळके, संजय शेळके, पांडुरंग शेळके आणि बबन शेळके, यांनी पल्लवीची अनेक वेळा छेड काढली होती. या सततच्या त्रासामुळे बेजार झालेल्या पल्लवीनं, अखेर कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप केला आहे. दरम्यान पल्लवीनं छेडछाडीची तक्रार करुनही पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनेनंतर चिडलेल्या लोकांनी छेड काढल्याचा आरोप असलेल्या या तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. या छेडछाड आणि आत्महत्या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.