थरार... विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवलं...

निफाडच्या तामसवाडी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आले. २० तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश आल्याने वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केलंय..

Updated: Nov 22, 2015, 09:45 AM IST

निफाड : निफाडच्या तामसवाडी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आले. २० तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश आल्याने वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केलंय..

शुक्रवारी रात्री शिकारीसाठी मार्गस्थ असणारा बिबट्या अंदाज न आल्याने तारुखेडले येथील गुलाब आण्णा शिंदे यांच्या विहिरीत पडला. सकाळी जयंत शिंदे उसाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याला बिबट्याच्या जोरदार डरकाळ्या ऐकू आल्या.

विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच त्याने वडिलांच्या मदतीने वनखात्याला याबाबत माहिती दिली.. अखेर 20 तासांच्या अथक मेहनतीनंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात आलं.. रेस्क्यू ऑपरेशनला यश येताच वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी नाशिक येथे करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.