खडसेंनी केली विठ्ठलाची महापूजा

आज कार्तिकी एकादशी... लाखो वारक-यांनी पंढरपूर गजबजलंय.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय.. 

Updated: Nov 22, 2015, 08:51 AM IST
खडसेंनी केली विठ्ठलाची महापूजा  title=

पंढरपूर : आज कार्तिकी एकादशी... लाखो वारक-यांनी पंढरपूर गजबजलंय.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय.. 

कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आलीय.. 

राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर आणि राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे असं साकडं खडसेंनी विठूरायाला घातलंय..

मालेगावच्या जादूवाडीतल्या दामोदम सोमासे आणि लक्ष्मी सोमासे या दाम्पत्याला खडसे यांच्यासह शासकीय महापूजेचा मान मिळाला.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.