अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर

अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर पडला आहे. शहराची पुढील तीन महिन्यांची तहान मिटली आहे. मांजरा नदीवरील नागझरी बंधा-याची पातळीत वाढ झाली आहे.

Updated: Apr 16, 2015, 11:06 AM IST
अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर title=

लातूर : अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर पडला आहे. शहराची पुढील तीन महिन्यांची तहान मिटली आहे. मांजरा नदीवरील नागझरी बंधा-याची पातळीत वाढ झाली आहे.

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले असले. मात्र याच अवकाळी पावसामुळे लातूर शहराची पुढील तीन महिन्याची तहान मिटविली आहे. लातूर तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा नदीवरील नागझरी बंधाऱ्यात २ पॉईंट २३ दशलक्ष घनमीटर पाणी साठले आहे. 

महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार जवळपास पुढील तीन महिने पुरेल इतके हे पाणी आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील अत्यल्प पाणी साठ्यामुळे सध्या शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. 

मे महिन्यात पाणी टंचाईत आणखी वाढ होणार होती. मात्र दोन दिवसापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरडं पडलेले मांजरा नदीवरील नागझरी बंधाऱ्याचे पात्र हे भरले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.