एका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. 

Updated: Apr 9, 2016, 05:15 PM IST
एका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई    title=

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने नुकतीच 'क्लीन माय कोच' ही सेवा सुरू केली आहे. या सेवेमार्फत प्रवाशांना ते प्रवास करत असलेला डबा अस्वच्छ असल्यास तो तातडीने साफ करुन घेता येणार आहे. 

शुक्रवारी मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेसमध्ये या सेवेचा प्रारंभ झाला. ट्रेन क्रमांक १०१०४ मध्ये पहिल्यांदा ही सेवा प्रवाशांना देण्यात आली. 

यासाठी प्रवाशांना केवळ खाली दिलेली प्रक्रिया करायचीये
CLEAN<10digit PNR>  असा एसएमएस टाईप करुन 58888 या क्रमांकावर पाठवायचा. 

हा मेसेज पाठवला की ट्रेनमधील ऑनबोर्ड हाऊसकिपिंग स्टाफला त्याची सूचना मिळेल आणि ते तुमच्या आसनाजवळ साफसफाई करतील. 

'कोकण रेल्वे नेहमीच त्यांच्या प्रवाशांच्या समाधानासाठी कटीबद्ध आहे. त्यासाठी दर्जेदार आणि चांगल्या सोयीसुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्वच्छ भारत - स्वच्छ रेल अंतर्गत आम्ही ही सेवा सुरू केली आहे,' असं कोकण रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. 

गेल्याच महिन्यात भारतीय रेल्वेच्या इतर गाड्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. आता कोकणातील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.